भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे 23 ऑगस्टला गोव्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शाॅर्ट व्हिडीओ प्लॅटफाॅर्म टिकटाॅकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
केवळ शाॅर्ट व्हिडीओ आणि राजकारणच नव्हे, तर सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगाट यांनी निधनाच्या काही तासांपूर्वी सोमवारी रात्री इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तसेच, सोनाली फोगाट यांनी बहुचर्चित बिग बाॅस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या सिजनमध्ये देखील भाग घेतला होता.
( हेही वाचा: खुशखबर! दिवळीत मुंबईतील म्हाडाच्या 4 हजार घरांची लाॅटरी; लवकरच घोषणा )
2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा 29 हजार मतांनी पराभव झाला होता.
Join Our WhatsApp Community