‘मोपा’ या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मनोहर पर्रिकर यांचे नाव

213

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 11 डिसेंबर 2022 रोजी मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या विमानतळामुळे पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. या विमानतळाची काय खासियत आहे? हे जाणून घ्या.

2 हजार 870 कोटी रुपये खर्च

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाची पायभरणी करण्यात आली होती. माहितीनुसार, हे विमानतळ तयार करण्यासाठी 2 हजार 870 कोटी रुपये खर्च आला आहे. उद्घाटनाप्रसंगी ते म्हणाले की, मोपा विमानतळाच्या उभारणीनंतर गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. पंतप्रधान म्हणाले की, 2 विमानतळांमुळे गोव्यामुळे कार्गो हब बनवण्याची शक्यता वाढली आहे.

( हेही वाचा: राज्यपालांकडून भूमिका स्पष्ट, अमित शाहांना पत्र; म्हणाले, ‘…स्वप्नातही कल्पना करू शकत नाही’ )

विमानतळाची खासियत काय?

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोव्याच्या उत्तरेकडील भागात आहे. गोव्याची राजधानी पणजीपासून 35 किमी अंतरावर आहे. मार्च 2000 मध्ये केंद्र सरकारने गोवा राज्य सरकारला मोपा गावात ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याची परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात, विमानतळाची वार्षिक क्षमता सुमारे 44 लाख प्रवासी आहे, तर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याची एकूण क्षमता वार्षिक 10 दशलक्ष प्रवासी होईल. हे विमानतळ दिसायला खूपच प्रेक्षणीय आहे. जगातील सर्वात मोठी विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टीही तयार करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.