घरात सोने ठेवताय? तर ‘हे’ नियम तुम्हाला माहिती हवेत

189

भारतात सणासुदीला सोने खरेदी करणे शुभ समजतात. सोन्याचा भाव नियमितपणे वाढत असल्यामुळे त्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे. असे असले तरी घरात सोने बाळगण्याशी संबंधित काही नियम आहेत. तसेच, सोन्याच्या गुंतवणुकीवर करही लागतो. त्याबद्दल जाणून घेऊया.

‘या’ खरेदीवर कर लागत नाही

केंद्रीय थेट कर बोर्डानुसार, गुंतवणुकदाराने घोषित उत्पन्नातून अथवा शेतीसारख्या आयकर सूट असलेल्या उत्पन्नातून सोने खरेदी केले असल्यास कर लागत नाही. याशिवाय वाजवी घरगुती बचतीतून अथवा वारसा हक्काने मिळालेल्या उत्पन्न स्त्रोतातून केलेल्या सोने खरेदीवरही कर लागत नाही.

किती सोने बाळगू शकतो?

भारतीय नागरिकांना ठराविक वजनाइतके सोने बाळगण्याची परवानगी आहे. ठराविक वजनापेक्षा कमी सोन्याचे दागिने तपास अधिकारी छाप्यातही जप्त करु शकत नाहीत. विवाहित स्त्री 500 ग्रॅम सोने बाळगू शकते. अविवाहित स्त्री 250 ग्रॅम सोने, तर कुटुंबातील पुरुष सदस्य 100 ग्रॅम सोने बाळगू शकतो. याशिवाय, ज्ञात स्त्रोतातून मिळालेल्या उत्पन्नातून खरेदी केलेले कितीही सोने बाळगण्याचा अधिकार भारतीय नागरिकास आहे.

( हेही वाचा: सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना ‘इतक्या’ भारतीयांची होते फसवणूक, सर्व्हेतून माहिती समोर )

सोन्यावर लागतो भांडवली कर

सोने बाळगण्यास कर लागत नसला तरी विक्रीसाठी हा नियम लागू होत नाही. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जवळ बाळगलेले सोने विकल्यास त्यातून मिळणा-या उत्पन्नावर 20 टक्के दराने दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागतो. खरेदीनंतर 3 वर्षांच्या आत सोने विकल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न व्यक्तीच्या नियमित उत्पन्नात गृहीत धरले जाते. त्यावर आयकर स्लॅबनुसार कर लागतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.