Gold – Silver Price : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

141
Gold - Silver Price : सोनं एका दिवसांत १,००० रुपयांनी तर चांदी ४,००० रुपयांनी महागली
Gold - Silver Price : सोनं एका दिवसांत १,००० रुपयांनी तर चांदी ४,००० रुपयांनी महागली

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला (Gold – Silver Price) सोने २०० रुपयांनी स्वस्त होत ६१, ४०० रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३,५०० रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. यामुळे विजयादशमीला ग्राहकांना स्वस्तात सोने लुटता येणार आहे.

तसेच आज म्हणजेच मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी २२ कॅरेट (Gold – Silver Price) सोन्याचा भाव ५७,५८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,४६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध (Gold – Silver Price) आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. तर २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

(हेही वाचा – Transfer of Charted Officers : पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी)

दरम्यान जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपर्यंत (Gold – Silver Price) ६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

म्हणून दरात वाढ होणार

पश्चिम आशियातील युद्धसंकटामुळे जगभरातील बाजार कोसळले असून, त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला आहे. भारतीय शेअर बाजार काल म्हणजेच सोमवार २३ ऑक्टोबर रोजी ८२५ अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ८ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. (Gold – Silver Price)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.