अयोध्येत राममंदिराच्या भव्य निर्माणकार्य चालू आहे. लोकार्पण सोहळा जवळ येत असल्याने तेथील कामांनी गती पकडली आहे. मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिली आहे. (Ayodhya Rammandir)
(हेही वाचा – Dahihandi In Mumbai : पहा, मुंबईतील दहीहंडी उत्सवाचा छायाचित्रमय थरार !)
या दरवाजासह मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत. या दरवाज्यांवर सुंदर व कोरिव नक्षीकाम केले जाणार आहे. त्यामध्ये, मोर, कलश, चक्र आणि फुलांचे नक्षीकाम होणार आहे. गर्भग्रहाच्या भिंती आणि फरशीवर मकरानाचे पांढरे मार्बल असणार आहे. त्यावर इनले कलाकारी करण्यात येणार आहे. या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या बालरूपातील रामललाच्या २ मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत. त्यातील एक मूर्ती चल, तर दुसरी मूर्ती अचल असणार आहे. (Ayodhya Rammandir)
मंदिर उभारणीसाठी देश-विदेशातील भाविक आपापल्या परीने दान देत आहेत. अनेक कलाकार, उद्योजक त्यांची कला रामरायाच्या चरणी अर्पण करत आहेत. राजस्थानमधून आणलेले पहाडपूर येथील सँडस्टोन, मकराना संगमरवर, तेलंगणाचे ग्रेनाईट, महाराष्ट्रातील लाकडाचा वापर करण्यात येत आहे. तसेच मंदिरात बसवण्यासाठी चंडीगढ येथे खास वीट बनवण्यात येणार आहे.
भाविकांकडून सढळ हस्ते दान
अयोध्येत मंदिर उभारणीचे काम सुरू झाल्यापासून भाविक करोडो रुपयांचे सोने-चांदी अर्पण करत आहेत. श्रीराममंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजा आणि खिडक्यांवर चांदीचा वापर केला जाणार आहे. तर रामललाच्या दागिन्यांसाठी आणि हारासाठी सोन्याचा वापर केला जाईल. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजा आणि खिडक्यांमध्ये वापरलेली चांदी हरिद्वार पीठाने समर्पित केली आहे. हरिद्वार काशी मठाचे उत्तराधिकारी स्वामी संयमेंद्र महाराज यांनी यापूर्वीच 167.4 किलो चांदी आणि 47.8 ग्रॅम सोने रामललाच्या चरणी अर्पण केले आहे. रामभक्तांनी यापूर्वीच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 500 किलोहून अधिक चांदी दान केली आहे. रामलला ज्या सिंहासनावर बसतील त्या सिंहासनाची ची ३ फुटांपेक्षा जास्त असेल. यावरही चांदीचे काम केले जाणार आहे. (Ayodhya Rammandir)
हेही पहा –