-
ऋजुता लुकतुके
लॅब्रेडॉर, जर्मन शेफर्ड, पग, गोल्डन रिट्रिव्हर, बिगल अशा पाळीव कुत्र्यांच्या लोकप्रिय प्रजाती भारतात आहेत. यातील गोल्डन रिट्रिव्हर हा सोनेरी रंगाचे केस आणि लोकांमध्ये रमणारा असल्यामुळे हल्ली सर्वांचा लाडका आहे. पण, पाळीव कुत्रा घरी आणणं ही फक्त आवड नाही. कारण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पसंतीबरोबरच त्यासाठी लागतात पैसे. पाळीव प्राण्याला घरी आणण्याचे. आणि मग त्याला सांभाळण्याचे. (Golden Retriever Price in India)
इथे गोल्डन रिट्रिव्हरची किंमत आणि त्याची माहिती जाणून घेऊया.
गोल्डन रिट्रिव्हरचं फरबॉल पिल्लू १५,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान मिळतो. पण, पपच्या पालकांची केसीआय नोंदणी झाली असेल तर असं पिल्लू ३५,००० ते ५०,००० रुपयांना मिळतं. पण, जो उच्च प्रजातीचा गोल्डन रिट्रिव्हर असतो त्यासाठी तुम्हाला ५०,००० ते ७०,००० रुपये मोजावे लागू शकतात. तुम्ही घेत असलेला गोल्डन रिट्रिव्हर खरा आणि उच्च प्रजातीचा आहे की नाही हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत. (Golden Retriever Price in India)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यात लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का!)
पिल्लाच्या पालकांची नोंद असेल आणि त्यांची माहिती नीट उपलब्ध असेल तर त्यावरून पिल्लू १०० टक्के गोल्डन रिट्रिव्हर आहे ना याची माहिती मिळू शकते. शिवाय गोल्डन रिट्रिव्हर पिल्लाची उंची साधारण २३ ते २४ इंचांची असते. स्त्रीलिंगी पिल्लू असेल तर उंची २१ ते २२ इंच असते. आणि पिलाचं वजन साधारणपणे २९ ते ३५ किलो इतकं असतं. मादी पिल्लाचं वजन २५ ते २९ किलोंचं असतं. यावरुन तुम्ही घेत असलेलं पिल्लू गोल्डन रिट्रिव्हरच आहे ना हे तुम्ही तपासून पाहू शकता. (Golden Retriever Price in India)
गोल्डन रिट्रिव्हरची वैशिष्ट्यही पाहूया.
गोल्डन रिट्रिव्हर प्रजाती खेळकर पण, त्याचवेळी फारशी आक्रस्ताळी नाही. त्यांचं लहान मुलांबरोबर जमतं. पण, ते मुलांना त्रासही देत नाहीत. पाळीव कुत्र्यांमध्ये गोल्डन रिट्रिव्हरना हुशार प्रजाती म्हणून ओळखलं जातं. कारण, ते चटकन माणसं ओळखतात. त्यांना उच्चारलेले शब्दही कळतात. आणि ते परिस्थितीशी जुळवून घेण्यात माहीर आहेत. घरात आलेल्या पाहुण्यांनाही ते जास्त त्रास देत नाहीत. पण, त्याचवेळी घर राखण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. (Golden Retriever Price in India)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्द्यांची निवडणूक आयोगाने घेतली दखल)
ते विश्वासू आणि कायम माणसाबरोबर राहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी छान दोस्ती करता येते. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. अर्थात, पाळीव कुत्र्याबरोबर खेळणं आपल्याला आवडतं. तसंच त्यांना वेळच्या वेळी खायला देणं महत्त्वाचं आहे. गोल्डन रिट्रिव्हरची पूर्ण वाढ झाली असेल तर त्याला खायलाही मजबूत लागतं. ते आकाराने मध्यम श्रेणीचे असतात. त्यांना छोटा मासा, कच्चं मांस, मांसाची हाडं, अंडी हे खायला आवडतं. त्याचबरोबर त्यांना बाजारात तयार मिळणारं कुत्र्याचं अन्नही चालतं. गोल्डन रिट्रिव्हर पोळी, भात तसंच पालेभाज्याही खातात. दिवसातून किमान दोनदा त्यांना पाणी द्यावं लागतं. (Golden Retriever Price in India)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community