प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे सुत्रधार गोल्डी ब्रार याला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोल्डीला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ही बातमी समोर येत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासूनच गोल्डीचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. अद्याप गोल्डी ब्रारला अटक केल्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
गोल्डी ब्रार गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडात बसून अनेक गंभीर गुन्ह्यांची सूत्र हलवत होता. कॅनडातूनच तो भारतात खून आणि तस्करीचे काम करत होता. त्यासाठी त्याला लाखो रुपये मिळत असल्याची माहिती समोर आली होती. परदेशात बसूनच सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट गोल्डी ब्रारने रचल्याचे बोलले जात आहे. त्यानेच आपल्या गुंडांकडून सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो अमेरिकेत पळून गेला. मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्यावतीने एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये त्याने मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचे कबूल करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.
( हेही वाचा: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल- हमीशी अल- कुरेशीचा युद्धात मृत्यू; नव्या म्होरक्याचे नाव घोषित )
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारने सिद्धू मुसेवाला यांना दिलेली 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोपर्यंत काॅंग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले होते. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली होती. आप सरकारने ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मनसा जिल्ह्यातून काॅंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डाॅक्टर विजय सिंघला यांनी पराभव केला होता.