केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स म्हणजे एचबीएसाठीचे (House building allowance) व्याजदर कमी केले आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी मार्च २०२३ पर्यंत ७.१ टक्क्यांच्या स्वस्त व्याजदराने हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स म्हणजेच गृहनिर्माण भत्त्याचा लाभ घेऊ शकतात. गृहनिर्माण कर्जावरील व्याजदर ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवेला प्रवाशांची प्रतीक्षा)
१ एप्रिल २०२२ रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मार्च २०२२ पर्यंत कर्मचाऱ्यांना वार्षिक ७.९० टक्के दराने घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम मिळत होती परंतु आता व्याजदर ७.९ टक्क्यांवरून ७.१ केल्यामुळे तुलनेने कमी खर्च येणार आहे.
गृहनिर्माण भत्ता म्हणजे काय ? ( House building allowance)
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम देते यामध्ये कर्मचारी स्वत:च्या किंवा पत्नीच्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊ शकतो. ही योजना १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ७.९ टक्के व्याजदराने घर बांधण्यासाटी आगाऊ रक्कम देत होती. याचे व्याजदर आता ७.१ टक्के करण्यात येऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आगाऊ रक्कम किती मिळते?
सरकारने दिलेल्या या विशेष सुविधेअंतर्गत कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनानुसार ३४ महिन्यांपर्यंत किंवा कमाल २५ लाख रुपयांपर्यंत अशा दोन प्रकारे आगाऊ रक्कम घेऊ शकतात.
Join Our WhatsApp Community