रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महिलांना बसप्रमाणे रेल्वेमध्येही आरामदायी प्रवास करता येणार आहे. कारण आता रेल्वेतही महिलांना आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली आहे.
…म्हणून महिलांना आरक्षित सीटचा लाभ
रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला असून महिला प्रवाशांसाठी आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले की, लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये महिलांसाठी आरक्षित सीट असायला हव्यात, असा विचार सुरू होता आणि आता त्यावर प्रत्यक्ष अमंलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे बस किंवा मेट्रोमधून प्रवास करताना महिलांसाठी आरक्षित सीटची सुविधा असते. सीट आरक्षित असल्याने महिलांना प्रवासामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. याच धर्तीवर आता रेल्वेमध्ये देखील महिलांना आरक्षित सीटचा लाभ देण्यात येणार आहे.
(हेही वाचा- पुण्याला जाताय? उद्या ‘ही’ एक्स्प्रेस असणार रद्द)
या महिलांना असणार विशेष प्राधान्य
इथून पुढे लांब पल्ल्याच्या मेलमध्ये स्लिपरकोचमध्ये महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असणार आहेत. थ्री टिअर एसी डब्यामध्ये देखील महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. आरक्षित सीट पैकी लोअर सीट हे प्राधान्याने ज्येष्ठ महिला आणि गर्भवती महिला यांना देण्यात येणार असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community