श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून रेंगाळणा-या नैऋत्य मोसमी वा-यांनी रविवारचा मुहूर्त साधत आज, रविवारी केरळात आगमन केले. भारतीय वेधशाळेने केरळात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. भारतीय वेधशाळेच्या पूर्वअंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे दोन दिवसांच्या विलंबाने केरळात दाखल झाले.
नैऋत्य मोसमी वारे केरळात दाखल
भारतीय वेधशाळेचे पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी मान्सून कननुर, पालकड आणि मदुराईपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली. मान्सूनचे केरळ आणि तामिळनाडू राज्यांत आगमन झाले. केरळातील बराचसा तर तामिळनाडूतील काहीसा भाग नैऋत्य मोसमी वा-यांनी व्यापला. रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत केरळात अपेक्षित पाऊस पडला. सकाळी केरळाजवळ आकाशही ढगाळ असल्याचे दिसून आले. याअगोदर २७ मे रोजी मान्सूनची वाटचाल दिसून आली होती. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर दुस-या दिवशी नैऋत्य मोसमी वा-यांनी २७ तारखेला अरबी समुद्रातील काही भाग व्यापला. त्यानंतर दोन दिवसांनी आज नैऋत्य मोसमी वारे केरळात दाखल झाले.
(हेही वाचा- मोदींची ‘Mann ki Baat’; म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपपासून नवा भारत दिसतोय)
केरळात नैऋत्य मोसमी वारे दाखल झाल्याची घोषणा करताना भारतीय वेधशाळेकडून वातावरणात आवश्यक बदल दिसून आल्यानंतरच घोषणा केली जाते. हे निकष पुढीलप्रमाणे-
० केरळातील वा-यांची दिशा नैऋत्येकडे असावी
० केरळातील काही स्थानकांत अडीच मिलीमीटर पाऊस झाला असावा.