आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि नकारात्मकता खूप असते. त्यामुळे बऱ्याचदा हे जीवन नकोसे, कंटाळवाणे भासते. त्यामुळेच जीवनात प्रेरणादायी क्षण शोधणे महत्वाचे ठरते. त्यासाठी चांगलं वाचन करणे, (Good Thoughts in Marathi) चांगलं पाहणे, ऐकणे तसेच यशस्वी व्यक्तींचे विचार वाचणे महत्वाचे ठरते.
(हेही वाचा – World Water Day : म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिन)
याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला काही सुंदर सुविचार (Good Thoughts in Marathi) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही सकारात्मक व्हाल.
सकारात्मक सुविचार :
१. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे हा नशिबाचा भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा कर्माचा भाग असतो.
२. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे.
३. ज्ञानी, सद्गुणी व्यक्ती दुसऱ्या कोणाशीही कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायला जात नाही.
४. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो. (Good Thoughts in Marathi)
५. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
६. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
७. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!
८. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशी होण्याच्या भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
९. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
१०. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. (Good Thoughts in Marathi)
११. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो आहोत.
१२. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारणं सांगत नाहीत.
१३. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.
१४. माणसाला दोनंच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे.
१५. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातलीये, जो झिजेल तोच चमकेल. (Good Thoughts in Marathi)
१६. ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात, तर आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत राहतात.
१७. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत, त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.
१८. आयुष्य हे एक नाते आहे, ते कधीही संपत नाही. (Good Thoughts in Marathi)
१९. स्वप्ने ही केवळ स्वप्ने नसतात, ती भविष्याची झलक असतात.
२०. संघर्ष म्हणजे केवळ वेदना नव्हे, तर त्याचा विजय अधिक गोड असतो.
२१. सर्व काही आवाक्यात आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःचे ध्येय शोधले पाहिजे
२२. जग विशाल आहे, परंतु आपला दृष्टीकोन अद्वितीय आहे (Good Thoughts in Marathi)
(हेही वाचा – World Poetry Day : २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन का साजरा केला जातो?)
स्वामी विवेकानंद यांचे विचार (Swami Vivekananda Quotes In Marathi) आजही युवापिढीसाठी प्रेरणा स्त्रोत ठरणारे आहेत. त्यामुळे आजच्या पिढीनेही स्वामींच्या विचारांचा नक्की अभ्यास करावा. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार नक्की आत्मसात करा.
१. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
२. दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
३. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. (Good Thoughts in Marathi)
४. असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
५. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.
६. जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community