छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्री आरमार उभे करण्यात सिंहाचा वाटा असलेले सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा गुगलवर समुद्री चाचे असा उल्लेख होता. ही बाब समोर येताच त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियात उमटले. गुगलवर चौफेर टीका होवू लागली, त्यामुळे अखेर गुगलने आपली चूक सुधारत कान्होजी राजे आंग्रे यांचा उल्लेख नौदलाचे अधिकारी असा केला.
काय होते प्रकरण ?
गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले होते. याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली आहे. गुगल आणि विकिपीडिया हे दैनंदिन माहिती मिळण्याचे स्त्रोत समजले जातात. जगभरातील माहिती गोळा करण्यासाठी या दोन माध्यमांची मदत घेतली जाते. मात्र गुगलवर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्री चाचे असा करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर या प्रकरणी समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे यात गुगलवर जोरदार टीका होवू लागली.
कोण होते कान्होजी आंग्रे?
मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांना ओळखले जाते. ब्रिटिश डच पोर्तुगीज यांची अनेक आक्रमण त्यांनी परतावून लावली. भारतीय नौदलाकडून त्यांना मेंटोर म्हणून बघितले जाते.
Join Our WhatsApp Community