Google Doodle 2023: गुगलने बनवले नवं वर्षाच्या शुभेच्छा देणारे डूडल

161

गुगलने एक विशेष डूडल शेअर करत, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2022 या वर्षाला गुडबाय म्हटल्यानंतर, 2023या नववर्षाच्या स्वागतासाठी गुगुलने हे खास डूडल तयार केले आहे.

गुगलने डूडलवर Google 2023 असे लिहिले आहे. गुगलने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बनवलेल्या या डू़डलमध्ये अनेक रंग आहेत. जे खूप आकर्षित वाटत आहेत. गूगलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जेव्हा वर क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला गुगलने शेअर केलेले हे अनोखे एनिमेटेड डूडल दिसेल.

( हेही वाचा: नवीन वर्षात मोठी दुर्घटना: नर्सिंग होमला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू )

कसे आहे हे डूडल?

गूगलने तयार केलेल्या डूडलमध्ये GOOGLE हे अनेक रंगात चमकताना दिसेल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकजण आपल्या कुटुंबियांना तसेच, मित्रपरिवाराला शुभेच्छा देत असतो. अशाच शुभेच्छा तुम्हालाही आपल्या प्रीयजनांना द्यायच्या असतील तर, तुम्हीही गूगलने तयार केलेल्या डूडलसारखे क्रिएटीव्ह डूडल बनवून पाठवू शकता. अथवा, तुम्ही गूगलने तयार केलेले डूडलही इतरांना पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त डूडलला शेअर करावे लागेल. गूगलने 2022 च्या शेवटच्या दिवशी देखील शुभेच्छा देणारे डूडल बनवले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.