गुगलने अँजेलो मोरिओन्डो यांच्या १७१ व्या जयंतीनिमित्त कलात्मक डूडल साकारले आहे. अँजेलो मोरिओन्डोला गुगलचे गॉडफादर मानले जाते. १८८५ मध्ये मोरिओन्डो यांना पहिल्या एस्प्रेसो मशीनचे पेटंट घेण्याचे श्रेय मिळाले.
पहिल्या एस्प्रेसो मशीनचे पेटंट
अँजेलो मोरिओन्डो जन्म ६ जून १८५१ रोजी इटलीतील ट्यूरिन येथे उद्योजकांच्या कुटुंबात झाला. अँजेलो यांनी त्यांच्या दोन भावांसोबत मिळून मोरिओन्डो आणि गॅरिग्लिओ ही लोकप्रिय चॉकलेट कंपनी तयार केली. मोरिओन्डोंच्या काळात इटलीमध्ये कॉफी अत्यंत लोकप्रिय होती. मात्र कॉफी तयार होण्यासाठी ग्राहकांना खूप वेळ वाट पहावी लागायची.
( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 198 ट्रेन रद्द; अशी तपासा रद्द झालेल्या गाड्यांची यादी )
यानंतर १८८४ मध्ये ट्यूरिन येथील जनरल एक्स्पोमध्ये मोरिओन्डोने एस्प्रेसो मशीन सादर केले. सादरीकरणापूर्वी त्यांनी हे मशीन हे मॅकेनिकच्या देखरेखीखाली ठेवले होते. मशीनमध्ये एका मोठा बॉयलर होता. २३ ऑक्टोबर १८८५ रोजी पॅरिसमध्ये नोंदणी केल्यानंतर या आंतरराष्ट्रीय पेटंटद्वारे या शोधाची पुष्टी झाली आणि मोरिओन्डोला पेटंट मिळाले. असे गुगलने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community