Google Job Cuts : गुगलमध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीचे संकट?

गूगलने यापूर्वीही वर्षाच्या सुरुवातीला १२ हजार कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली होती.

198
Will Google Charge For Searches? गुगल खरंच गुगल सर्चसाठी आपल्याकडून पैसे घेणार का?

जगातील आघाडीची टेक कंपनी गूगल इनक मध्ये पुन्हा एकदा नोकरी कपातीचे संकट आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १२ हजार कर्मचाऱ्यांची नोकर कपात केली होती. कंपनीने ही सर्वात मोठी कपात केली होती. आता गुगल आपल्या जाहिरात विक्री (Addvertising Department)बदल करणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नोकर कपातीची प्रक्रिया सुरू केले असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. तर या संबंधित विभागात सुमारे ३० हजार लोक काम करतात. (Google Job Cuts)

यापुर्वी गुगलचे सीइओ सुंदर पिचाई यांनी सांगितले की, नोकर कपात करणे हा कोणत्याही कंपनी साठी अवघड निर्णय असतो. २५ वर्षात गुगलवर सही कधीच वेळ आली नव्हती. जगत वेगाने होत असलेल्या बदलांना सामोरे जाताना आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आम्ही नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकत नाही. तर यासंदर्भात झालेल्या बैठकीत जाहिरात विक्री संघाची पुनर्रचना करण्याच्या योजनेबाबत माहिती सांगितली. नोकर कपातीची चर्चा नसली तरी कर्मचा ऱ्यांमध्ये भीतीचे संकट वाढले आहे. (Google Job Cuts)

(हेही वाचा : Weather Forecast: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहणार, वाचा हवामानाचा अंदाज)

का होऊ शकते नोकर कपात
एआय यामध्ये सतत गुगल गुंतवणूक करत आहे. याशिवाय जाहिरात खरेदीमध्ये कंपनी मशीन लर्निंग चा वापर करत आहे. एआयमुळे अनेक ठिकाणी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या मुद्द्यावर गूगलने अद्याप काही स्पष्ट केलेले नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.