जगभरात मंदीचे सावट येण्यास सुरूवात झाली आहे. मेटा, ट्विटर, अॅमेझॉन या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. या सर्व टेक कंपन्यांप्रमाणेच आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखली आहे.
गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेट सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारी आहे. याअंतर्गत खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यामुळे गुगलची मूळ कंपनी असणाऱ्या अल्फाबेट कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. गुगलने कर्मचारी कपातीचा कोणताही निर्णय उघड केला नव्हता. मात्र अल्फाबेटच्या माध्यमातून ती अशा इतर कंपन्यांपैकी एक बनली आहे. दरम्यान, काढून टाकण्यात येणारे 10,000 कर्मचारी हे अल्फाबेटच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के असतील, असेही सांगितले जात आहे.
(हेही वाचा – Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्याची आरोपी आफताबची कबुली; म्हणाला जे काही घडले…)
मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने कर्मचाऱ्यांसाठी नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स प्लॅन बनवला आहे. या नव्या योजनेनुसार गुगलचे व्यवस्थापक त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना येत्या नवीन वर्षात कामावरून कमी करणार आहे. यासह ते कर्मचाऱ्यांचे ग्रेडिंग करून बोनस आणि इतर भत्तेही थांबवू शकणार आहेत. समोर आलेल्या एका अहवालात असे म्हटले की, नोकरी कपात झाल्यास कंपनी नवीन भूमिका आणि धोरणांसह अर्ज करण्यासाठी कर्मचार्यांना 60 दिवस देणार आहे. टीसीआय फंड मॅनेजमेंटने गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला खर्चात कपात करण्यासाठी त्यांचे कर्मचारी कमी करण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community