तुम्ही वापरत असलेल्या Google pay ला RBI ची मान्यता नाही?

214

तुम्ही गुगल पे (Google Pay), फोन पे ( Phone Pay),पेटीएम (PayTM) हे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही वापर असलेल्या गुगलपेला आरबीआयकडून (RBI) मान्यता नाही, असा दावा करणारा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. गुगल पे बरेचजण वापरत असल्याने Viral Message खरा आहे का ते पाहूया.

झटपट पेमेंट करण्यासाठी गुगल पे बरेच जण वापरतात. पण, याच गुगल पे साठी आरबीआयने पेमेंट सिस्टिमसाठी मान्यता दिली नाही. हा दावा धक्कादायक असल्याने अनेकांना गुगल पे सुरक्षित नाही का असा सवाल पडू पाडला आहे. अनेकजण गुगल पे वापरत असल्याने, व्हायरल होणार मेसेज खरा की खोटा हे पडताळणे गरजेचे आहे.

( हेही वाचा: विहिरी खोदा आणि लखपती व्हा; काय आहे शासन आदेश? )

काय म्हटलंय मेसेजमध्ये?

आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात गुगल पे ला मान्यता दिली नसल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. NPCI मधील अधिकृत पेमेंट सिस्टिमच्या यादीत गुगल पे नाही. पेमेंट करताना काही चूक झाल्यास त्याची तक्रारही करता येणार नाही. हा मेसेज व्हायरल होत आहे.

आरबीआयची मान्यता नसल्याचा दावा खोटा

गुगल पे आरबीआयची मान्यता नसल्याचा दावा खोटा आहे, गुगल पे ला UPI पेमेंटसाठी मान्यता देण्यात आली आहे. NPCI व्या अधिकृत पेमेंट सिस्टिमच्या यादीत गूगल पे आहे, पेमेंट करताना चूक झाल्यास त्याची तक्रारही करता येते. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या दाव्यात तथ्य नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.