Google Pixel : गुगल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात करण्याचा गुगलचा निर्णय

गल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात करण्याचा निर्णय गुगलने जाहीर केला आहे.

302
Google Pixel : गुगल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात करण्याचा गुगलचा निर्णय
Google Pixel : गुगल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात करण्याचा गुगलचा निर्णय
  • ऋजुता लुकतुके

गुगल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात करण्याचा निर्णय गुगलने जाहीर केला आहे. २०२४ मध्ये गुगल ८ या फोनच्या उत्पादनाने याला सुरुवात होईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने आपल्या गुगल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २०२४ मध्ये बाजारात येणारा गुगल पिक्सल ८ या फोनपासून देशातील उत्पादन प्रक्रियेला सुरुवात होईल. भारतातील उत्पादनासाठी देशातील प्रमुख उत्पादकांशी चर्चा करणार असल्याचं गुगलचे उत्पादन विभागाचे प्रमुख रिक ऑस्टरलोव्ह यांनी सांगितलं. (Google Pixel)

‘गुगल कंपनीने भारताच्या मेक इन इंडिया प्रकल्पाला मदत करण्याचं मान्य केलं आहे. त्या अंतर्गत आता भारत आणि आशियाई देशांमध्ये वितरित होणारे फोन भारतात बनवण्याचा आमचा इरादा आहे,’ असं ऑस्टरलोव्ह म्हणाले. भारताचे दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ऑस्टरलोव्ह यांनी ही घोषणा केली. यापूर्वी ॲपल तसंच फॉक्सकॉन या आघाडीच्या कंपन्यांनी आपले फोन आणि चिपचं उत्पादन भारतात सुरू केलं आहे. ॲपल कंपनीनेही आशियन देशात वितरित होणारे आयफोन भारतात बनवण्याची तयारी दाखवली आहे. तर फॉक्सकॉन कंपनीने दक्षिणेत चेन्नई इथं मोठा कारखाना सुरू करण्याची तयारी चालवली आहे. (Google Pixel)

(हेही वाचा – Sonawala Agyari Road : माहिममधील सोनावाला अग्यारी रोड की टँकर गल्ली)

थोडक्यात, भारताच्या मेक इन इंडिया रणनीतीला पाश्चात्य देशांकडून पाठिंबा मिळतोय. यापूर्वी हे देश चीनमध्ये तयार होणारे मोबाईल फोन जगभरात वितरित करत होते. आता हळू हळू चीनची जागा भारत घेताना दिसतोय. शिवाय याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी ऑनलाईन बैठक घेतली होती. त्यात गुगल पिक्सलचा फोन भारतात बनवण्यावरही चर्चा झाली होती. (Google Pixel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.