गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. तसेच ते गांधी यांचे राजकीय गुरूसुद्धा होते. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते होते. एवढंच नाही तर ते ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ नावाच्या सोसायटीचे संस्थापकही होते. सोसायटी तसेच काँग्रेस आणि इतर कायदेमंडळांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली.
सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न
गोपाळ कृष्ण गोखले यांनी देशातील सामाजिक सुधारणांसाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विद्यमान सरकारी संस्थांसोबत काम केले. गोखले हे पूना असोसिएशन किंवा पूना सार्वजनिक सभेचे प्रमुख सदस्यही होते. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ साली रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात असलेल्या कोटलुक या गावात राहत असलेल्या चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.
आर्थिक परिस्थिती फार चांगली नसूनही गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पालकांनी त्यांना इंग्रजीतून शिक्षण देण्याचे ठरवले. त्याकाळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. म्हणून त्यांच्या पालकांना वाटलं की आपल्या मुलाला ब्रिटिश राजवटीत लिपिक किंवा किरकोळ अधिकारी म्हणून नोकरी मिळवता येईल. त्यांचं पुढचं शिक्षण त्यांनी कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजमधून पूर्ण केलं.
(हेही वाचा – संघ आणि विहिंपच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला; Lt. Col. Purohit यांचा गौप्यस्फोट)
शिक्षणाचा कारकिर्दीवर मोठा प्रभाव
गोपाळ कृष्ण गोखले यांनी १८८४ साली एल्फिन्स्टन महाविद्यालयातून (Elphinstone College) पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्यावर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सामाजिक कार्याचा मोठा प्रभाव होता. त्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे मानसपुत्र म्हणूनही ओळखलं जातं होतं. गोखले यांच्या शिक्षणाचा त्यांच्या पुढच्या कारकिर्दीवर खूप मोठा प्रभाव पडला होता. इंग्रजी शिकण्याव्यतिरिक्त त्यांना पाश्चात्य राजकीय विचारांचा परिचयही होता.
गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक हे चांगले मित्र होते. त्यांच्या विचारांमध्ये मतभेद असले तरी गोखले आणि टिळकांना एकमेकांच्या देशभक्तीबद्दल, बुद्धिमत्तेबद्दल, सामाजिक कार्याबद्दल आणि त्यागाबद्दल खूप आदर होता. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये गोखलेंना श्रद्धांजली म्हणून संपादकीय लेख लिहिला होता.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community