भाजपची सर्वांधिक मदार शेट्टी आणि कोटकांवरच!

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आता जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे जे ८२ नगरसेवक निवडणून आले आहेत, त्यातील उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईतून भाजपचे ३९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपची सर्वांत जास्त मदार ही उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई असून या दोन जिल्हयांमधूनच सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारीही खासदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांना सध्याची संख्या कायम राखत अधिकचे संख्याबळ वाढवावे लागणार आहे.

शंभर पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य

मुंबई महापालिकेच्या सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर मुंबईत एकूण ४३ प्रभागांपैंकी २६ प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून आले आहे. ईशान्य मुंबईत ४५ प्रभागांपैंकी १३ भाजपचे नगरसेवक निवडून आले आहे. तर दक्षिण मुंबईत भाजपचे दहा नगरसेवक निवडून आले आहे

मात्र, आगामी निवडणुकीत भाजपने शंभर पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असून यासाठी उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईवरच अधिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे दोन्ही जिल्हे भाजपचे गड मानले जात आहेत. त्यामुळे भाजपला या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वांधिक नगरसेवक निवडून आणावे लागणार आहे. त्याचमुळे खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांच्यावर आता जास्त जबाबदारी असल्याने विद्यमान नगरसेवकांची संख्या कायम राखत त्यात अधिक भर पाडावी लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काठावर पराभव पत्करावा लागलेल्या प्रभागांमध्ये भाजपला अधिक लक्ष घालावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खासदारांनी जिल्हाध्यक्षांसह वॉर्ड अध्यक्षांना कामाला लावल्याची माहिती सुत्रांकडन मिळत आहे. त्यामुळे खासदार कोटक यांनी खेल महोत्सव घेऊन जिल्हा ढवळून काढला आहे, तर गोपाळ शेट्टी यांनी वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून आपल्या जिल्ह्यात सर्वांनाच कामाला लावले असल्याचीही माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : वाडीबंदर येथे मध्य रेल्वेचे फुलपाखरू उद्यान)

दक्षिण मुंबईत दहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु उत्तर मुंबई व ईशान्य मुंबईबरोबरच दक्षिण मुंबईवर भाजपची भिस्त असून याठिकाणीही सर्वांधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी लोढा यांच्यासह जिल्हाध्यक्ष यांच्यावर असणार आहे. दक्षिण मुंबईतील शीव कोळीवाडा विधानसभेत भाजपचे आमदार असून या मतदार संघात व चेंबूरमध्ये भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक आणि वडाळा, माहिम, अणुशक्ती नगरमध्ये प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने आता भविष्यात वडाळा विधानसभेत आपली संख्या वाढवण्यासह अणुशक्ती नगरमध्ये खाते उघडण्याचाही प्रयत्न सुरु केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here