केतकीची रात्र कारागृहात, गुरुवारी गोरेगाव पोलीस घेणार ताबा!

116

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या केतकीला काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र केतकीला बुधवारी, 18 मे रोजीची रात्र कारागृहात घालवावी लागणार आहे, गुरुवारी गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेणार आहेत.

(हेही वाचा – परप्रांतियांना झालेल्या मनस्तापाबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केला खेद )

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मंगळवारी केतकीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज बुधवारी, ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)

केतकीने स्वत:च न्यायालयात मांडली होती बाजू

रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी केतकीला हजर केले होते. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडल्याचे दिसून आले. केतकीने न्यायालयात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, तिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की, मी या पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे. शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.