अचलपुर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास झेंडा काढण्याचा झालेला वाद विकोपाला जाऊन गोटमार झाल्याने शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
काय घडला प्रकार?
अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभाप्रमाणे विविध धर्माचे झेंडे लागतात. मात्र रविवारी रात्री बाराच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला काही काळात वादाचे रूपांतर गोटमारीत झाले. मध्यरात्री शहर निद्रिस्त असताना झालेला हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच एसआरपी व स्थानिक पोलिसांनी हा वाद नियंत्रणात आणला.
(हेही वाचा -मुंबईतील या भागात जमावबंदीचे आदेश, हे आहे कारण)
शहरात रात्रीपासून जमाबंदी
यावेळी पोलिसांनी अश्रुधुरेच्या नळकांड्या सुद्धा फोडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गरुड म्हणाले की, अचलपुरात दोन गटात झालेला वाद विकोपाला जाण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात रात्रीपासून जमाबंदी करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही गटातील ३५ जणांना ताब्यात घेतले आहे.
Join Our WhatsApp Community