समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेल्सवर केंद्र सरकारने सोमवारी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलवर बनावट बातम्या प्रसारित केल्या गेल्या आणि धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या व्हिडिओमध्ये फेरफार केला आहे. या व्हिडिओमध्ये बोगस बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेले व्हिडिओ याचाही समावेश होता. अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
( हेही वाचा : महापालिकेचे नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष अभियान : माता सुरक्षित तर घर सुरक्षित)
जवळपास 45 व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले
गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार, 10 युट्यूब चॅनेलसह 45 व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या व्हिडिओला एकूण 1. 30 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत आणि सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचा दावा यात केला आहे. या व्हिडिओमध्ये समाजामध्ये तेढ आणि भिती पसरवणारा संदेश आहे. बंदी असलेल्या साहित्याचा वापर करून बनावट बातम्या आणि धार्मिंक द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने प्रसारित केलेल्या व्हिडिओचा यात समावेश आहे. त्यात म्हटले आहे की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातलेल्या काही व्हिडिओंचा वापर अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र सेना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मिर या विषयांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला गेला आहे.
Join Our WhatsApp Community