GST च्या महसुलात महाराष्ट्राचा वाटा अव्वल

सप्टेंबर महिन्यात एकूण 1,47,686 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन

129

सप्टेंबर 2022 मध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी महसुलात महाराष्ट्राचा वाटा सर्व राज्यांमध्ये जास्त आहे. महाराष्ट्राचे योगदान 21,403 कोटी रुपयांचे असून, त्यापाठोपाठ कर्नाटकचे योगदान कितीतरी कमी 9,760कोटी, तमिळनाडूचे 8,637 कोटी, हरयाणाचे 7,403 कोटी व उत्तरप्रदेशचे योगदान 7,004 कोटी रुपयांचे आहे. सप्टेंबर महिन्याचे एकूण जीएसटी संकलन सर्वाधिक 1,47,686 कोटी रुपये आहे. त्यापैकी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 1,05,615 कोटींचा आहे. सप्टेंबर 2021 पेक्षा हा आकडा 22 टक्के जास्त आहे.

(हेही वाचा – फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार! दोन क्लबचे समर्थक भिडले, 129 जणांचा बळी)

सरकारने नियमित समझोत्याच्या आधारावर, आयजीएसटी मधून 31,880 कोटी, सीजीएसटी तर, 27,403 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून धरले आहेत. या दोन्ही विभाजनानंतर, केंद्र आणि राज्य सरकारांचे सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलन, 57,151(CGST) आणि 59,216 (SGST) इतके आहे. सप्टेंबर 2022 मधील महसूल संकलन, गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील जीएसटी महसूल संकलनाच्या तुलनेत, 26 टक्के अधिक आहे. या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल, गेल्यावर्षीच्या तुलनेत, 39% अधिक होता. तर, देशांतर्गत व्यवहारातून संकलित झालेला महसूल गेल्यावर्षी पेक्षा, 22% अधिक होता.

जीएसटी संकलन सातत्याने, अधिक असण्याचा हा आठवा महिना असून, गेले सलग सात महीने, जीएसटी महसूल संकलन, 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून, सप्टेंबर 2022 पर्यंत, जीएसटी संकलनात, 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट, 2022 मध्ये देशांत, 7.7 कोटी ई-वे बिल्स तयार झाले, जुलै, 2022 च्या 7.5 कोटी बिलांच्या तुलनेत, हा आकडा लक्षणीयरित्या अधिक होता.

या महिन्यात, 20 सप्टेंबर या एकाच दिवशी 49,453 कोटी रुपये महसूल संकलन झाले.. आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे 8.77 लाख चालान भरले गेले. याआधी, केवळ जुलै महिन्यात, म्हणजे आर्थिक वर्ष परतावे भरण्याची मुदत संपत असतांना, 20 जुलै ह्या एकाच दिवशी, सप्टेंबरपेक्षा अधिक, म्हणजे, 57,846 कोटी रुपये 9.58 लाख चालान (पावत्या) मधून भरले गेले होते. या चालानच्या विक्रमी संख्येचा स्पष्ट अर्थ हाच आहे, की, जीएसटीएनचे जीएसटी पोर्टल, आता निर्वेधपणे, स्थिर काम करत आहे. सप्टेंबर महिन्यात, आणखी एक मैलाचा दगड पार करण्यात आला. या महिन्यात,30 सप्टेंबरपर्यंत एकूण 1.1 कोटी ई-वे बिल्स आणि ई-इनव्हॉईसेस तयार करण्यात आले. (यात, 72.94 लाख ई-इनव्हॉईसेस आणि 37.74 लाख ई-वे बिल्स). एनआयसीच्या पोर्टलवर या कामात कुठलाही अडथळा आला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.