कोरोनाच्या काॅलर ट्यूनला वैतागलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी! आता…

117

देशात कोरोना विषाणूचा शिरकाव होताच, सरकारने कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक पाऊले उचलली. लोकांपर्यंत कोरोना विषाणूपासून बचावाचा संदेश पोहोचावा म्हणून सरकारने कोरोनाची काॅलर ट्यून सुरु केली. मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची काॅलर ट्यून ऐकू येत आहे. त्यामुळे आता अनेक लोक या काॅलर ट्यूनला वैतागले आहेत.

लवकरच बंद होणार काॅलर ट्यून

केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता लवकरच लोकांची या काॅलर ट्यूनमधून सूटका होण्याची शक्यता आहे. या कॉलर ट्यूनचा उद्देश पूर्ण झाला आहे. काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे कॉल्स करताना या कॉलर ट्यूनमुळे उशीर होतो. त्यामुळे ही काॅलर ट्यून बंद करावी यासाठी अनेक अर्ज सरकारला प्राप्त झाले आहेत. दूरसंचार विभागाने  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया तसेच मोबाइल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख आहे.

( हेही वाचा: ऑस्करच्या मंचावर हाणामारी, स्मिथने लगावली होस्टच्या कानशिलात! )

दूरसंचार विभागाने सुरु केली होती काॅलर ट्यून

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनंतर, ही ‘कॉलर ट्यून’ दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. दूरसंचार सेवेने लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी, तसेच लसीकरणाबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी कॉल करण्यापूर्वी कोरोना व्हायरसशी संबंधित कॉलर ट्यून ऐकवली जात होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.