देशातील वस्तूसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक, पुरातन वस्तूंचे संवर्धन, जुन्या कलाकृती, अवशेष जपून ठेवल्या जातात. भारताला हजारो वर्षांच्या इतिहासाचा समृद्ध वारसा संग्रहालयांमुळे लाभलेला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता इत्यादी शहरांमध्ये देशांतील महत्त्वाची संग्रहालये आहेत. त्यापैकी चेन्नईतील राजकीय संग्रहालय देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने संग्रहालय (Government Museum Chennai) आहे. या ठिकाणी भूविज्ञान, प्राणी विज्ञान आणि वनस्पती विज्ञान या विषयांसंदर्भातील वस्तू संग्रहित आहेत.
सरकारी म्युझियम, चेन्नई किंवा मद्रास म्युझियम हे मानवी इतिहास आणि संस्कृतीचा वारसा (Heritage of culture) जतन करणारे संग्रहालय आहे. हे भारतातील सर्वात जुने वस्तुसंग्रहालय आहे. अधिकृतपणे सरकारी संग्रहालय, चेन्नई म्हणून ओळखले जाणारे हे १८५१ मध्ये स्थापन करण्यात आले. या संग्रहालयात विविध प्रकारचे दागिने, शिल्पे, नाणी, पुरातत्त्वीय शोध आणि इतर संकल्पनांचा वैविध्यपूर्ण संग्रह आहे, ज्यामुळे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करणे सुलभ होतो. ही शहरातील एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था आहे.
नॅशनल आर्ट गॅलरी…
म्युझियम पॅन्थिऑन कॉम्प्लेक्स किंवा “सार्वजनिक असेंब्ली रूम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी आहे. हे एग्मोर येथील पॅन्थिऑन रोडवरील शासकीय संग्रहालय संकुलात आहे. ज्या रस्त्यावर संग्रहालय आहे त्या रस्त्याचे नावदेखील संकुलावरून घेतले आहे. गव्हर्नमेंट म्युझियम कॉम्प्लेक्समध्ये कोनेमारा पब्लिक लायब्ररी आणि नॅशनल आर्ट गॅलरीदेखील आहे.
(हेही वाचा – Ganpat Gaikwad Firing : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा काम करते; गणपत गायकवाडांचा न्यायालयात आरोप; ११ दिवसांची पोलीस कोठडी )
वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम…
काचेच्या खिडक्या, सुशोभित लाकूडकाम आणि विस्तृत स्टुको सजावटीने या संग्रहालयाची वस्तू उभी राहिली आहे. येथील कोनेमारा पब्लिक लायब्ररीही पुस्तकप्रेमींना आकर्षित करणारी आहे. ही इमारत नंबेरुमल चेट्टी यांनी बांधली होती आणि हेन्री इर्विन यांनी या इमारतीला वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सजवले आहे. ज्याचे आतील भाग बँक ऑफ मद्रास (SBI) सारखे होते. या नक्षीकामात स्टेन्ड काचेच्या दोन वक्र रांगांमध्ये लाकडी छत असलेली एक विशाल वाचन खोली… ज्याला सुशोभित खांब आणि कमानी कोरलेल्या अकॅन्थसच्या पानांनी सुशोभिकरण केले असल्याने तेथील सागवानी फर्निचर, संगमरवरी मजले आणि खिडक्यांची सजावट पाहणाऱ्या आकर्षून घेत असे.
वस्तूसंग्रहालयाची वैशिष्ट्ये-
– १६.२५ एकर क्षेत्रात पसरलेले हे राज्य संग्रहालय दक्षिण आशियातील सर्वात मोठे संग्रहालय मानले जाते. या संकुलात ६ स्वतंत्र इमारती आणि ४६ दालने आहेत.
– येथे प्राचीन कलाकृती, शिल्पे, प्राण्यांचे दालन, वनस्पतिशास्त्रीय दालन आणि टपाल तिकिटांचे दालन आहे.
– समोरील इमारतीत एक मनोरंजक कठपुतळी दालन आणि लोकनृत्य आणि संगीत दालन आहे.
– कांस्य गॅलरीत कांस्य कलाकृतींव्यतिरिक्त मुद्राशास्त्र आणि रासायनिक संवर्धन दालने आहेत.
– मुलांसाठी संग्रहालयाचा एक विभाग आहे. ज्यामध्ये बाहुल्यांचा एक वर्ग, एक विज्ञान आणि तंत्रज्ञान गॅलरी आहे.
– नॅशनल आर्ट गॅलरीमध्ये उत्कृष्ट चित्रे आणि कलाकृती आहेत.
– समकालीन कला दालनांमध्ये खडक आणि गुहा कलेपासून ते इंग्रजी चित्रे आणि आधुनिक कलेपर्यंतचा समावेश आहे. यात कलेचा विकासात्मक प्रवास दाखवण्यात आला आहे.
वेळः सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू असते, शुक्रवारी आणि राष्ट्रीय सुटीच्या दिवशी बंद असते.
प्रवेश शुल्क
– भारतीय नागरिक: प्रौढांसाठी १५ रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी १० रुपये, पूर्वपरवानगी घेऊन आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासाठी ५ रुपये.
– परदेशी नागरिकः प्रौढांसाठी २५० रुपये आणि ३-१२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १२५ रुपये, पूर्वपरवानगी घेऊन आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासाठी ७५ रुपये.
– कॅमेरा किंमतः छायाचित्रणासाठी २०० रुपये आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी ५०० रुपये
संग्रहालयाला भेट देणाऱ्यांसाठी काही नियम –
१. व्यावसायिक छायाचित्रणास परवानगी नाही.
२. संग्रहालयात वेळोवेळी विशेष व्याख्याने आणि चित्रपट प्रदर्शने आयोजित केली जातात.
३. कांस्य दालन आणि राष्ट्रीय कला दालन अनिवार्य आहे.
४. राज्य संग्रहालयात एक पुस्तकांचे दुकानदेखील आहे. जेथे अत्यल्प किमतीतील पुस्तके उपलब्ध आहेत.
हेही पहा –