7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो तसेच वर्षातून दोनदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ करण्यात येते. परंतु पगारवाढीसाठी हा शेवटचा वेतन आयोग असणार आहे. आता नवा वेतन आयोग लागू होणार नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढवला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. ६८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५२ लाख पेन्शनधारकांसाठी सरकार नवा फॉर्म्युला बनवत आहे. या फॉर्म्युलानुसार एका ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होईल. ही पगारवाढ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : म्हाडाचे घर घेताय? राज्य सरकारने उत्पन्न मर्यादेत केला मोठा बदल)

आता कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यांच्या कामगिरीनुसार ( performance linked increments) वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार आता नव्या फॉर्म्युलाचे फायदे, तोटे बघत याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेचा विचार करत आहे.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांना फायदेशीर

केंद्र सरकारने वेतनवाढीचा नवा फॉर्म्युला लागू केल्यास जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. सर्वच प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे बेसित वेतन २१ हजारांवर पोहोचेल. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच प्रकारचा लाभ मिळेस यावर सध्या सरकार आपले लक्ष केंद्रीत करत आहे म्हणूनच पगारवाढीसाठी वेतन आयोग न आणता नवा फॉर्म्युला विकसित करण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here