जुगारासाठी चक्क महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा वापर!

धाडीत २३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त; वीस जणांवर गुन्हा दाखल

164

मंगळवारी मध्यरात्री कणकवली पोलिसांनी शहरातील निमेवाडी उचवळे येथे नदीकिनारी जुगारावर टाकलेल्या धाड टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला. या धाडीत चक्क ‘महाराष्ट्र शासन’ असा उल्लेख असलेली इर्टीगा कार जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा उल्लेख असलेली कार घेऊन संशयित आरोपी चेतन जामसांडेकर (रा. सर्जेकोट मालवण) हा जुगारात सहभागी झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली. तर याच जुगारात जे काही संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले त्यामधील काहींनी आपल्या दुचाकी जाग्यावरच टाकून पळ काढला.

धाडीत २३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

या जुगाराच्या छाप्यात १ लाख २४ हजार रुपये रोख, १२ दुचाकी, १ रिक्षा, १ ईर्टीगा कार व १ इको कार जप्त करण्यात आली. सर्व मिळून सुमारे २३ लाख ६० हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुगार खेळत असताना पोलिसांची धाड पडू नये म्हणून जुगार चालू असलेल्या ठिकाणच्या रस्त्याच्या काही अंतरावर खबरी ठेवून पोलीस येण्यापूर्वी जुगारी पसार होत असत. मात्र आज रात्री टाकलेल्या धाडीत पोलिसांनी चारही बाजूंनी जुगाऱ्याना व त्यांच्या खबऱ्यांना चकवा देत अत्यंत नियोजनबद्धरीत्या छापा टाकला. यातील काही जण जंगलातुन पळताना किरकोळ जखमी झाल्याची ही चर्चा कणकवलीत जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी जुगार सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत रात्रीच्या काळोखात बॅटरीशिवाय जाऊन धाड टाकली.

(हेही वाचा – औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला ‘या’ राजकीय संघटनांचा तीव्र विरोध)

राजकीय वरदहस्त असलेली नावे चर्चेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईमध्ये जयवंत बाईत कणकवली, रवींद्र बाणे आशिये, सिद्धेश बांदेकर कणकवली, महादेव कुपेरकर आवळेगाव, संदीप पाताडे कणकवली, राजू जमादार कणकवली, चेतन जामसंडेकर सर्जेकोट, प्रवीण आरोलकर वागदे, नितीन बांदेकर देवबाग, यशवंत देसाई कणकवली, निलेश हेरेकर कणकवली, संदीप राणे कणकवली, नयन सुतार कणकवली, प्रदीप शिरसेकर मालवण, संकेत बांदेकर कणकवली, मोसिन मुजावर मालवण, राजेंद्र सावंत आवळेगाव, नदीम मुजावर मालवण, संतोष चव्हाण कडावल, रमेश येरागी देवबाग या सर्व संशयितांवर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पकडलेल्या आरोपींमध्ये अनेक राजकीय वरदहस्त असलेली नावे सुद्धा चर्चेत आहेत. कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ, कैलास इपाळ, बाळू गुरव, रुपेश गुरव, चंद्रकात माने, किरण मेथे, चंद्रकात झोरे, पांडुरंग पांढरे, दाजी सावंत, कीरण कदम, आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.