पाकिस्तान आता ‘चहा’लाही तरसणार

141

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. परकीय चलन झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सरकार सातत्याने जनतेवर निर्बंध लादत आहे. सुरुवात केली ती लग्नाच्या वरातीवरुन. रात्री दहानंतर कोणीही वरात काढू नये, असा फतवा निघाला. आता दिवसभरात एक -दोन कप चहा कमी प्या, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी बुधवारी इस्लामाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानी नागरिकांना एक-दोन कप चहा कमी प्या, असे आवाहन केले. पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा चहा आयातदार आहे. त्यासाठी कर्ज काढावे लागते. सध्या देशाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, म्हणून हे आवाहन करत असल्याचे इक्बाल यांनी म्हटले.

एका वर्षात रिचवला 84 अब्जांचा चहा

2021-22 या आर्थिक वर्षात पाकिस्तानी नागरिकांनी 84 अब्ज रुपये किमतीचा चहा रिचवला. पाकच्या आर्थिक अंदाजपत्रकानुसार, 13 अब्जांचा चहा सरकारला आयात करावा लागला. त्यामुळे अतिरिक्त चहा पिण्याची सवय कमी करुन नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. अन्यथा कर्ज काढून चहाची आयात करावी लागेल, असे इक्बाल यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.