देशातील बॅंकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून परदेशी गेलेल्या नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्ल्या यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ हजार १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या सात वर्षांत सेटलमेंट्स आणि इतर उपायांमधून ५.४९ लाख कोटी रुपये वसूल केले आहेत. असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्र्यांची लोकसभेत माहिती
फरार थकबाकीदारांच्या मालमत्ता विकून बँकांनी आतापर्यंत १३ हजार १०९ रक्कम वसूल केली आहे. या वसुलीची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी जुलैमध्येच दिली होती, मात्र आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही अधिकृत माहिती संसदेत दिली आहे.
( हेही वाचा : परीक्षा घोटाळ्यानंतर आता ठाकरे सरकारचा निकाल घोटाळा! )
कर्ज न फेडल्याचा आरोप
विजय माल्ल्या यांच्यावर अनेक बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. याशिवाय हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांनी पीएनबीसह अनेक बँकांचे १३ हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती. अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या सात वर्षांत सेटलमेंट्स आणि इतर उपायांमधून ५.४९ लाख कोटी रुपये वसूल केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community