देशात एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढलेले असतांना दुसरीकडे अर्थ मंत्रालयाकडून काही वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थ मंत्रालयाकडून सामान्य माणसांना ही भेट मिळाली आहे.
अर्थ मंत्रालयानं सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. त्यानुसार आता मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त होणार आहेत. तसेच अर्थ मंत्रालयाकडून अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दरांत मोठी कपात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं या वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे, कुलर, गिझर इत्यादींवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
With reduced taxes, #GST brings happiness to every home: Relief through #GST on household appliances and mobile phones 👇#6YearsofGST #TaxReforms #GSTforGrowth pic.twitter.com/6qbdaERpzp
— Ministry of Finance (@FinMinIndia) June 30, 2023
(हेही वाचा – Ashish Shelar : भाजपचा नियोजित मोर्चा रद्द : “आज आम्ही काही बोलणार नाही पण…” – आशिष शेलार)
27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा टीव्ही स्वस्त
जीएसटीच्या नव्या दरांनुसार, जर तुम्ही 27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा टीव्ही खरेदी केला, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील. तसेच, बहुतेक कंपन्या किमान 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराचे टीव्ही तयार करतात. 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराच्या टीव्हीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर 31.3 टक्के जीएसटी लागू होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community