New Government Scheme : सरकार देणार महिलांना मोफत शिलाई मशीन! वाचा काय आहे योजना

आपल्या देशातील महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. देशातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन आर्थिक स्थिती सुधारणे हा योजनांमागील प्रमुख हेतू असतो. अशा योजनेअंतर्गत सरकारने महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना आखली आहे.

( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)

महिलांना स्वबळावर रोजगार निर्माण करता येईल

मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत महिलांना सरकार शिलाई मशीन देणार आहे. यामुळे महिलांना स्वत:चा रोजगार सुरू करण्याची संधी मिळणार आहे. सरकारमार्फत देशातील ५० हजारांहून अधिक महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना स्वबळावर रोजगार निर्माण करता येईल. यामध्ये आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे अशा महिलांनाच मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ घेता येईल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  • वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी अशा महिलांना लाभ
  • विधवा आणि अपंग महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुमचे वय २० ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र

आधारकार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो हे पुरावे सादर केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here