राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळेच राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही. पण कडक निर्बंध लावण्यात येणार आहे, असे म्हटले. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले.
राजेश टोपे काय म्हणाले?
रुग्णालयात जास्त प्रमाणात बेड, आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते. रुग्णालयांना किट्स वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉन आणि डेल्टा रुग्णांना ओळखणे गरजेचे आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे. हे सर्वांसमोरील एक आव्हान असेल. रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच संसर्गावर आळा घालण्याला आमचे प्राधान्य आहे. डेल्टा आणि ओमयाक्रॉन रुग्णांचे प्रमाण समजणे गरजेचे आहे. राज्यात सर्व ठिकाणी टेस्टिंग सुरु आहेत. मुंबईतील रुग्ण संख्या वाढण्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 10 च्या आसपास गेला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. मेट्रो शहरांमध्ये निर्बंध अधिक कठोर असू शकतात. सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनची भीती बाळगू नये. पण रुग्ण संख्या आटोक्यात न आल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण?)