Govind Dev Giri Ji Maharaj : कोरोनाकाळात स्वामीजींच्या प्रवचनांमुळे अनेकांना आधार मिळाला; नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वामीजींच्या कार्याचा गौरव

Govind Dev Giri Ji Maharaj : समान नागरी कायद्याविषयीही अपप्रचार केला जात आहे. हिंदु सक्सेशन अॅक्टसारख्या कायद्याने महिलांना अनेक अधिकार मिळाले. समान नागरी कायद्याचा उपयोग विषमतांविषयी जागृती करण्यासाठी होऊ शकतो, असे नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या.

275
Govind Dev Giri Ji Maharaj : कोरोनाकाळात स्वामीजींच्या प्रवचनांमुळे अनेकांना आधार मिळाला; नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वामीजींच्या कार्याचा गौरव
Govind Dev Giri Ji Maharaj : कोरोनाकाळात स्वामीजींच्या प्रवचनांमुळे अनेकांना आधार मिळाला; नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वामीजींच्या कार्याचा गौरव

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे कार्य मोठे आहेच. कोरोना काळात प्रत्येकाच्या मनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दडपण होते. आपण कितीही धीराचे असलो, तरी सर्वांच्या मनात एकप्रकारची भीती होती. अशा काळात गीतेवर, अध्यात्मावर शेकडो प्रवचने ऑनलाईन घेऊन स्वामीजींनी १०० हून अधिक देशांतील लोकांना धीर दिला. आशीर्वाद दिला. हे त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. सर्व धार्मिक विचार समजून घेऊन त्यातून अनुभूती देण्याचे आपण कार्य स्वामीजी करत आहेत, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काढले. या वेळी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी धार्मिक आणि सामाजिक समस्या सांगून त्याविषयीही कार्य झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Govind Dev Giri Ji Maharaj)

(हेही वाचा – Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही मानतो; प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे हृद्य उद्गार)

त्या १४ जानेवारी रोजी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संपन्न झालेल्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्यात बोलत होते. हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या वेळी व्यासपिठावर आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत; सुरेश चव्हाणके यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा)

धर्मांतर रोखण्याविषयी सर्वेक्षण व्हावे !
  • मी अनेक अनुदानित अनाथाश्रमांमध्ये एक चित्र पाहिले. ज्या धर्माकडून तो अनाथाश्रम चालवला जातो, त्या धर्माची नावे त्या अनाथ मुलांना दिली जातात. त्या मुलांचे कुटुंबीय कोण होते, तेही पाहिले जात नाही. ती मुले मोठी झाल्यावर त्याच धर्माचे विचार पुढे घेऊन जातात. याविषयी मी विधीमंडळातही चर्चा घडवून आणली होती. सामाजिक न्याय विभाग आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. पण तोकडे पडतात. आपण कायद्याने इतके करू शकतो की, त्या मुलांना धर्माचे लेबल त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत दिले जाऊ नये. त्यासाठी नेहमीच्या परिघाबाहेर जाऊन कार्य व्हायला हवे, असे वाटते.
  • मी पुण्यात असतांना पाहिले आहे. गरीब, एकल महिलांना दर शुक्रवारी तांदूळ, डाळ दिले जातात. असे प्रकार आपण थांबवले, तरी थांबत नाहीत. अशी प्रलोभने, आमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. अशा लोकांना आधार दिला गेला पाहिजे. त्यासाठी नेहमीच्या परिघाबाहेर जाऊन प्रयत्न झाले पाहिजेत.
  • तरुण मुलींना फूस लावून देहव्यापार केला जात आहे. १५-१६ वर्षांच्या मुलींचा देहविक्रय केला जात आहे. तीच मुलगी ४-५ वर्षांनी पुन्हा त्याच वस्तीत दिसते. प्रौढ दिसायला लागलेली असते. तिचा वापर करून घेतलेला असतो. अशा प्रकारे प्रलोभनांनी, दिशाभूल करून धर्मांतर केले जात आहे. असे किती महिलांचे धर्मांतर केले जात आहे, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे.
  • समान नागरी कायद्याविषयीही अपप्रचार केला जात आहे. हिंदु सक्सेशन अॅक्टसारख्या कायद्याने महिलांना अनेक अधिकार मिळाले. समान नागरी कायद्याचा उपयोग विषमतांविषयी जागृती करण्यासाठी होऊ शकतो. त्याविषयी जागृती होणे आवश्यक आहे.

अशी दाहक वस्तूस्थिती सांगून त्याविषयी कार्य व्हावे, अशी अपेक्षा नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

मतदान केव्हा आहे, याची माहिती घेऊन मगच बाहेरगावी जावे

नीलम गोऱ्हे यांनी उपस्थितांना एक सल्ला दिला. ‘एप्रिल मध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असून शाळांच्या परीक्षा संपताच पालक मुंबईबाहेर फिरायला जातात. त्याचे बूकिंग आधीच केलेले असते. परिणामी आपल्याला हवे त्या उमेदवाराला मते कमी मिळतात, त्यामुळे असे एप्रिल महिन्यात निवडणूक मतदान केव्हा आहे याची माहिती घेऊन मगच बाहेरगावी जावे’, असे आवाहन गोऱ्हे यांनी केले. (Govind Dev Giri Ji Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.