गोविंद निहलानी (Govind Nihalani) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक आणि निर्माते आहेत. ते त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतल्या कित्येक चांगल्या प्रोजेक्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. विशेषत: ते समांतर सिनेमाच्या चळवळीसाठी ओळखले जातात. त्यांना सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
गोविंद निहलानी (Govind Nihalani) यांचा जन्म १९ डिसेंबर १९४० साली कराची येथे सिंध प्रांतात झाला. त्यांचं कुटुंब १९४७ साली भारताच्या फाळणीदरम्यान पाकिस्तानात न जाता भारतात स्थलांतरित झालं. गोविंद निहलानी यांनी १९६२ साली बंगळुरू इथल्या श्री जया चामराजेंद्र पॉलिटेक्निक येथून सिनेमॅटोग्राफीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी व्ही.के. मूर्ती यांचे सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मग त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं.
(हेही वाचा – Police : एसीपी पदोन्नतीसाठी यादी तयार, गृह विभागाने मागवली माहिती)
निहलानी (Govind Nihalani) यांनी श्याम बेनेगल यांच्या आधीच्या सर्व चित्रपटांत आपलं योगदान दिलं आहे. तसंच रिचर्ड ॲटनबरो यांच्या ऑस्कर-विजेत्या कालखंडातील चरित्रात्मक नाटक गांधीच्या सिनेमॅटोग्राफीचं कामही त्यांनी पाहिलं होतं. निहलानी आणि बेनेगल हे त्यांच्या सामाजिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला आक्रोश हा चित्रपट, दिग्दर्शक म्हणून निहलानी यांचा पहिला चित्रपट होता. आक्रोश या चित्रपटाची पटकथा प्रख्यात मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली होती. १९८१ साली नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गोल्डन पीकॉक पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी १९८३ साली एस.डी. पानवलकर यांच्या कथेवर आधारित अर्ध सत्य या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. १९९७ साली त्यांनी बंगाली कादंबरीकार महाश्वेता देवी यांच्या कादंबरीला हजार चौरासी की माँ या चित्रपटात रूपांतर केलं. (Govind Nihalani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community