भारत यावर्षी 75 डिजिटल बँका स्थापन करण्याचा विचार करत आहे. तसेच बँकिंग व्यतिरिक्त नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) स्थापन करण्याची देखील योजना असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील थिंक टँक अटलांटिक कौन्सिलला संबोधित करताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका होणार स्थापन
याआधीही निर्मला सीतारामन यांनी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका स्थापन करण्याबाबत सांगितले होते. यावेळी सीतारामन म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या आधी, भारताने वेगाने डिजिटायझेशन वाढवले आणि आम्ही आर्थिक समावेशाचा कार्यक्रम घेऊन आलो, जो याआधी जगात कुठेही दिसला नाही.
(हेही वाचा – ‘दोन दिवसात सगळं सुरळीत होईल…’, परबांनी मागितली जनतेची माफी!)
आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली
भारताचे तीन मोठे सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधार, UPI आणि Covin जगासमोर आले. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली. विशेष म्हणजे, आधार ही सर्वात मोठी सर्वत्र विशिष्ट डिजिटल ओळख असली तरी UPI हे सर्वात मोठे डिजिटल पेमेंट अॅप आहे. कोविनच्या माध्यमातून देशात 150 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. सीतारामन म्हणाल्या की, डिजिटल कार्यक्रमामुळे प्रत्येक विभागातील लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे.
श्रीलंकेला मदतीचे आश्वासन
यापूर्वी, अमेरिकेत झालेल्या IMF स्प्रिंग मीटमध्ये अर्थमंत्र्यांनी श्रीलंकेचे समकक्ष अली साबरी यांची भेट घेतली होती. यादरम्यान, त्यांनी साबरीला आश्वासन दिले की एक जवळचा मित्र आणि चांगला शेजारी म्हणून भारत श्रीलंकेला शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करेल.
Join Our WhatsApp Community