पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी राज्यातील विविध भागात 10 दिवसांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. घरगुती, सार्वजनिक आणि मानाचे अशा सर्व गणेशांच्या विसर्जनाची लगबग दिसून येतेय. राज्याची राजधानी असलेले मुंबई, उपराजधानीचे शहर नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या तिन्ही शहरांमध्ये सकाळपासूनच गणेश विसर्जनाची धूम आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !” असे म्हणत भाविक आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देत असल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, हजारो भाविकांची राजाला निरोप देण्यासाठी गर्दी)

पुण्यातला मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. पुण्यातल्या कसबा गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मराठी कलाकारांचा सहभाग असलेलं कलावंत ढोल ताशा पथक सज्ज झालं आहे. पुण्यातील गणेशोत्सवच्या सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात झाली असून मिरवणुकीसाठी पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. राष्ट्रीय कला अकादमीतर्फे 30 फुटी रांगोळी साकारण्यात आली आहे. सक्सेस, डिप्रेशन, एज्युकेशन या थीमवर अकादमी कडून भव्य रांगोळ्या काढून पायघड्याही घालण्यात आल्या आहेत.

तर पुण्यात या मिरवणुकीदरम्यान, सहभागी होणारी मंडळ त्याचप्रमाणे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. याची काळजी घेतली आहे. वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद तर रिंग रोड तयार करण्यात आला आहे. सकाळी सातपासून हे सगळे रस्ते काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी वळवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here