राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘आजी-आजोबा डे’ साजरा होणार; GR जारी

164

वर्षभरात विविध दिवस साजरे केले जातात. त्यातच आता राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी -आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शासन निर्णय झाला असून त्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणा-या रविवारी आजी- आजोबा दिवस साजरा केला जातो. हाच आजी- आजोबा दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

का म्हटंलय परिपत्रकात ?

सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई- वडील नोकरी अथवा व्यावसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरंतर आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचे नाते फार विलक्षण असते, खास असते. आजी-आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नाते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरेजेचे आणि प्रेरणादायी आहे, असे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

( हेही वाचा: IIT Bombayमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा )

‘हे’ उपक्रम राबवले जाणार 

  • सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा परिचय करुन द्यावा
  • आजी- आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.
  • विटीदांडू, संगित खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही
  • संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
  • आजी- आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा
  • पारंपारिक वेशभूषेमध्ये आजी-आजोबांना बोलवावे
  • महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे
  • शाळेतील विदयार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात
  • आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.