राज्यात माळढोक पक्ष्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे माळढोक पक्षी दिसल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे राज्यात आता माळढोक पक्ष्यांची संख्या दोनवर गेली आहे.
( हेही वाचा : Virat Kohli Birthday : कोहलीचे टॉप ५ ‘विराट’ विक्रम; बरोबरी करणे अशक्य)
देशभरात माळढोक हा पक्षी दुर्मिळ समजला जातो. या पक्ष्यांच्या शिकारीमुळे सध्या माळढोक पक्ष्यांची नेमकी संख्या वनविभागाकडे नव्हती . वनविभागाच्या दाव्यानुसार माळढोक पक्षी केवळ सोलापूर येथील नानौज माळढोक अभयारण्यात दिसून येत आहे. त्यात चंद्रपुरात तब्ब्ल सात महिन्यानंतर माळढोक पक्ष्याचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींना सुखद धक्का बसला. गेल्यावेळी केवळ दोन दिवस वरोरा येथे माळढोक पक्षी आढळला होता. यंदा शेतकऱ्यांना माळढोक पक्ष्याचे दर्शन झाले. गुरुवारी वरोरा येथील शेतात माळढोक आढळला, माळढोक पक्षी शेतकऱ्याने मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला. याबाबतची माहिती मिळताच शनिवारी संबंधित ठिकाणी भेट देऊन सत्यता तपासली जाईल, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. माळढोक आढळून आल्यास संबंधित शेताचा भाग सील केला जाईल. शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाईही दिली जाईल, असेही आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community