जे.बी. कृपलानी यांचे नाव जीवटराम भगवानदान कृपलानी असे होते. (Acharya J. B. Kripalani) त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी हैदराबाद येथे एका उच्च मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील भगवानदास सरकारी विभागात महसूल आणि न्यायिक अधिकारी होते. जे.बी. कृपलानी यांना ८ भावंडे होती. त्यांचा क्रमांक सहावा.
प्रारंभिक शिक्षण त्यांनी सिंध प्रांतातच घेतलं, त्यानंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे कराची येथील के.डी.जे. सिंध कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून १९०८ साली ते पदवीधर झाले. इतिहास आणि अर्थशास्त्रात एमए केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १९१२ ते १९१७ दरम्यान बिहारमध्ये ’ग्रियर भूमिहार ब्राह्मण कॉलेज मुजफ्फरपूर’मध्ये इंग्रजी आणि इतिहास शिकवायला सुरुवात केली. ते ’बनारस हिंदू विश्वविद्यालयात’ देखील शिकवत होते. (Acharya J. B. Kripalani)
(हेही वाचा – Cleaning Tips : या टिप्स फाॅलो केल्याने घराची साफसफाई करणे होईल सोपे)
१०१७ मध्ये चंपारण सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तेव्हा त्यांची गांधीजींशी भेट झाली. गांधीजींना भेटल्यानंतर ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. महात्मा गांधींनी १९१९ मध्ये स्थापन केलेल्या गुजरात विद्यापिठाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. १९२० मध्ये आचार्य कृपलानी असहकार चळवळीसाठी काम करत होते.
गुजरात आणि मुंबईच्या आश्रमात काही काळ राहिल्यानंतर ते उत्तर भारतात गेले व तिथे त्यांनी नवीन आश्रम स्थापन केले आणि गांधीजींनी सांगितलेल्या गोष्टींवर काम केले. ‘मिठाचा सत्याग्रह’, ‘सविनय कायदेभंग’, ‘भारत छोडो आंदोलना’त ते आघाडीवर काम करत होते आणि या चळवळींमध्ये भाग घेतल्याने त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले. (Acharya J. B. Kripalani)
(हेही वाचा – Maulana Abul Kalam Azad : राष्ट्रीय शिक्षण दिन कसा सुरु झाला ?)
कृपलानी लोकांना ब्रिटीश सरकारच्या विरोधात जागृत करायचे आणि ब्रिटीश सरकारच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करायचे, म्हणूनच त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला होता. तरीही न डगमगता ते आपले काम करतंच राहिले. भारतीय संविधान सभेमध्ये देखील त्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांनी आणीबाणीच्या विरोधातही लढा पुकारला होता. ते पूर्वी कॉंग्रेसमध्ये असले, तरी ते नेहरुंचे विरोधक होते. त्यांनी विनोबा भावे यांच्यासोबत पर्यावरणासाठी काम केले आहे.
१९ मार्च १९८२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे ‘माय टाइम्स’ हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर २२ वर्षांनी २००४ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सहकार्यांना (राम मनोहर लोहिया, महात्मा गांधी आणि खान अब्दुल गफार खान वगळता) भारताचे विभाजन करण्याची योजना स्वीकारल्याबद्दल दोष दिला आहे. (Acharya J. B. Kripalani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community