योगगुरू बेल्लूर कृष्णमचारी सुंदरराजा अय्यंगार (Yogaguru B.K.S. Iyengar) हे आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महान योग शिक्षक होते. त्यांनी योगासने परदेशात प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे लाखो परदेशी लोकांनी त्यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांची योगाभ्यासाची शैली ‘अयंगार योग’ या नावाने प्रसिद्ध झाली.
(हेही वाचा – Hasan Mushrif : महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी; हसन मुश्रीफ यांची माहिती)
गुरु श्री थिरुमलाई कृष्णमाचार्य यांच्याकडून योगशिक्षण
बी.के.एस. अयंगार (B.K.S. Iyengar) यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकातील (Karnataka) कोल्लर जिल्ह्यातील बेल्लूर येथे झाला. त्यांनी योगाचे पहिले धडे त्यांचे गुरु श्री थिरुमलाई कृष्णमाचार्य (Sri Thirumalai Krishnamacharya) यांच्याकडून गिरवले. योग शिकल्यानंतर त्यांना योगाची इतकी आवड निर्माण झाली की, त्यांना हे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित ठेवायचे नव्हते, तर ते सर्वांना सांगायचे होते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी लंडन (London), स्वित्झर्लंड (Switzerland), पॅरिस (Paris) आणि अनेक देशांमध्ये फिरून योगाचा प्रचार केला.
याेगासाठी उपयुक्त वस्तूंचा शोध
बी.के.एस. अयंगार (B.K.S. Iyengar) यांनी आसने योग्य प्रकारे करण्यासाठी काही उपयुक्त गोष्टींचा शोध लावला होता. जसे की ब्लॉक्स, बेल्ट, दोरी आणि लाकडापासून बनवलेल्या गोष्टी. योग्य आसनात योगासने करण्यासाठी व्यक्तीच्या शरीराची संरचना योग्य स्वरूपात असणे आवश्यक आहे. त्यांचा असा विश्वास होता की, जर आसन योग्य प्रकारे केले, तर शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे शरीर केवळ निरोगी रहात नाही, तर शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता देखील वाढते.
(हेही वाचा – Parliament Smoke Attack : आरोपींची आधी सोशल मीडियातून मैत्री; मग संसद घुसण्याची योजना रचली)
ग्रंथरचना आणि पुरस्कार
बी.के.एस. अयंगार (B.K.S. Iyengar) यांनी योगावर अनेक अस्सल ग्रंथ रचले, त्यातील मुख्य म्हणजे ‘लाइट ऑन योग’ (Light on yoga). त्यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ (Padmashri), २००२ मध्ये ‘पद्मभूषण’ (Padma Bhushan) आणि २०१४ मध्ये ‘पद्मविभूषण’ (Padma Vibhushan) देऊन सन्मानित करण्यात आले. २००४ मध्ये ‘टाइम’ मासिकाने त्यांचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला होता. त्यांनी १९४३ मध्ये रमामणी यांच्याशी लग्न केले. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर अय्यंगार यांनी पुण्यातील योग शाळेचे नाव त्यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवले. २० ऑगस्ट २०१४ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community