सत्यजित रे (Satyajit Ray) हे एक भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक, गीतकार, डॉक्युमेंटरी फिल्म्सचे निर्माते, निबंधकार आणि मासिकाचे संपादकही होते. द अपू ट्रायोलॉजी, द म्युझिक रूम, द बिग सिटी, चारुलता आणि गुपी बाघा हे त्यांनी दिग्दर्शन केले काही प्रसिद्ध चित्रपट आहेत.(Satyajit Ray)
(हेही वाचा- Jharkhand Congress X Account Withheld : अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई; झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड)
सत्यजित रे (Satyajit Ray) यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे झाला. सत्यजित रे (Satyajit Ray) यांनी एक व्यावसायिक कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. एकदा ते लंडनला गेले असताना, तिथे त्यांची भेट फ्रेंच चित्रपट निर्माते जीन रेनॉइर यांच्याशी झाली. त्यांच्या कामांनी सत्यजित रे हे खूप प्रभावित झाले होते. व्हिक्टोरिओ डी सिका यांचा इटालियन निओरियलिस्ट ’बायसिकल थिव्ह्ज’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सत्यजित रे (Satyajit Ray) हे स्वतंत्र शैलीच्या चित्रपट निर्मितीकडे वळले.
सत्यजित रे (Satyajit Ray) यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण छत्तीस चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांपैकी डॉक्युमेंटरी फिल्म्स, फिचर फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्सचाही सामावेश आहे. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेल्या पथेर पंचाली नावाच्या चित्रपटाला कांस चित्रपट महोत्सवात बेस्ट ह्यूमन डॉक्युमेंट अवॉर्ड देण्यात आला होता. याव्यतिरिक्त या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अकरा पारितोषिके मिळवली होती. (Satyajit Ray)
(हेही वाचा- Maharashtra Weather : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसणार!)
सत्यजित रे (Satyajit Ray) यांनी लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी अनेक कथा, लघुकथा आणि कादंबऱ्या लिहिल्यात. त्यांनी रेखाटलेल्या काही प्रसिद्ध लोकप्रिय पात्रांपैकी फेलुदा द स्लीथ, तारिणी खुरो कथाकार, प्रोफेसर शोन्कु आणि लाल मोहन गांगुली यांचा समावेश आहे.
सत्यजित रे (Satyajit Ray) यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे पुरस्कार मिळाले होते. त्यांपैकी भारतात छत्तीस नॅशनल फिल्म्स अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन लायन पुरस्कार, गोल्डन बेअर, सिल्व्हर बेअर पुरस्कार देण्यात आले होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना मानद पदवी प्रदान केली होती. भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. २०२१ साली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे (Satyajit Ray) जीवन गौरव पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले. सत्यजित रे हे त्यांच्या पिढीतले एक महान दिग्दर्शक होते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community