‘या’ पद्मविजेत्या महिलेला मोदी-शहांनी केलं अभिवादन; वाचा नेमकं कारण

राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराचं सोमवारी वितरण करण्यात आलं. २०२० च्या पद्म पुरस्काराने ११९ जणांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानित केलं. मात्र या पद्म पुरस्कार सोहळ्यात सर्वांनी एका महिलेचं कौतुक केलं. या महिलेल्या पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर या सोहळ्यात या महिलेची सर्वाधिक चर्चा झालेली दिसली. विशेष म्हणजे या महिलेला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी देखील अभिवादन केले. या महिलेचं नाव आहे तुलसी गौडा. कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा या महिलेने पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

पद्म पुरस्काराच्या वितरण सोहळ्यामध्ये तुलसी गौडा यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजेरी लावली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचं हात जोडून स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. हा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल फोटोला नेटकऱ्यांनी “पिक्चर ऑफ द डे” असे कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळाले. मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी तुलसी गौडा यांचा फोटो शेअर करून त्यांचे अभिनंदन केले आहे. या भेटीदरम्यान तुलसी गौडा आणि नरेंद्र मोदी यांच्यात संवाद झाला आणि यावेळी मोदी यांनी तुलसी गौड यांच्याशी हस्तांदोलन केल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान, तुलसी गौडा हे करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे ‘या’ पद्मविजेत्या महिलेला मोदी-शहांनी अभिवादन केले आहे.

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय फेटाळला! संप चिघळला)

कोण आहेत तुलसी गौडा

तुलसी गौडा या कर्नाटक राज्यातील होन्नाळी गावात राहण्यास आहेत. त्या गेल्या ६० वर्षांपासून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करत आहेत. तुलसी गौडा यांनी आतापर्यंत ३० हजार झाडांचं वृक्षरोपन केले आहेत. तुलसी गौडा या वनविभागाची नर्सरी देखील सांभाळतात. तुलसी गौडा यांचं वय ७७ वर्ष असून त्या हलक्की या आदिवासी जमातीचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांची इनसायक्लोपिडीया ऑफ फॉरेस्ट अशी ओळख आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here