ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान (Abhinandana vardhamana) व्हीआरसी हे मिग-२१ बायसन नावाच्या विमानाचे भारतीय वायुसेनेचे लढाऊ पायलट आहेत. त्यांनी २७ फेब्रुवारी २०१९ साली पाकिस्तान एअर फोर्सच्या एएम-ए-एम-एएम ट्राय एअर फोर्समधल्या F-१६ आणि JF-१७ सोबत जम्मू आणि काश्मीर येथे झुंज दिली होती. एलओसीपासून ७ किलोमीटर म्हणजेच ४.३ मैल एवढ्या अंतरावर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्यांचं विमान पाडून त्यांना कैद करण्यात आलं होत. त्यानंतर १ मार्च २०१९ साली त्यांना भारतात परत आणलं गेलं. (Abhinandana vardhamana)
अभिनंदन वर्धमान (Abhinandana vardhamana) यांचा जन्म २१ जून १८८३ साली थिरुपांनामुर नावाच्या गावातल्या एका तामिळ जैन कुटुंबात झाला. थिरुपांनामुर हे गाव कांचीपुरम येथून १९ किलोमीटर इतके लांब आहे. त्यांच्या वडीलांचं नाव सिंहकुट्टी वर्धमान असं आहे. ते IAF मधले रिटायर्ड एअर मार्शल आहेत आणि त्यांची आई डॉक्टर आहे. (Abhinandana vardhamana)
(हेही वाचा- Accident: नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ३ वाहनांचा अपघात, २० हून अधिक प्रवासी जखमी)
अभिनंदन वर्धमान (Abhinandana vardhamana) यांचं शिक्षण अमरावतीनगर इथल्या सैनिकी स्कुलमध्ये झालं. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवीही मिळवली. त्यानंतर १९ जून २००४ साली ते IAF म्हणजेच इंडियन एअर फोर्सच्या कोंबाट फायटर स्ट्रीममध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून रुजू झाले. (Abhinandana vardhamana)
त्यानंतर त्यांना भटिंडा आणि हलवारा इथल्या भारतीय वायुसेना केंद्रांमध्ये ट्रेनिंग देण्यात आली. काही काळाने १९ जून २००६ साली फ्लाइट लेफ्टनंट आणि ८ जुलै २०१० साली स्क्वाड्रन लीडर म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली. मिग-२१ बायसन स्क्वॉड्रनमध्ये नियुक्त होण्यापूर्वी अभिनंदन वर्धमान हे एक Su-३०MKI लढाऊ पायलट होते. १९ जून २०१७ साली त्यांना विंग कमांडर आणि नोव्हेंबर २०२१ साली ग्रुप कॅप्टन म्हणून बढती देण्यात आली. (Abhinandana vardhamana)
अभिनंदन वर्धमान (Abhinandana vardhamana) हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत चेन्नई येथे राहतात. त्यांच्या पत्नी तन्वी मारवाह या IAF च्या रिटायर्ड स्क्वार्डन लीडर आहेत. (Abhinandana vardhamana)
हेही पहा-