Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्स ३३२ अंकांनी वधारला

109
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्स ३३२ अंकांनी वधारला

गेल्या दिवसांपासून सुरु झालेल्या इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम शेअर बाजारावरही (Share Market) दिसत होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ९ ऑक्टोबर सोमवार रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.

सोमवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात (Share Market) घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये ५००, तर निफ्टीमध्ये १५०हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही तब्बल ५४० अंकांची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

(हेही वाचा – Western Railway Block : हार्बर नंतर आता पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक, २५० लोकल होणार रद्द; कारण…)

मात्र आज म्हणजेच मंगळवार १० ऑक्टोबर रोजी शेअर (Share Market) बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी बाजार उघडताच सोमवारी फटका बसलेल्या सेक्टरमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. तेलाच्या किमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बाजारातील आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली आहे.

जागतिक बाजारपेठेतील सुधारणेनंतर मंगळवारी (Share Market) सकाळी ९:१७ वाजता, बीएसई सेन्सेक्स ३३२.६० अंकांनी वाढून ६५,८४४.९९ वर आणि एनएसई निफ्टी ९४ अंकांनी वाढून १९,६०६.३५ वर पोहोचला होता. निफ्टीत अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स आणि टाटा मोटर्स यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर डॉ. रेड्डीज, ब्रिटानिया आणि टीसीएसचे शेअर्स पडले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.