सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी (GST Collection) अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
त्यामुळे आता जीएसटी संकलन (GST Collection) एकूण १.६२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असून चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा १.६ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या महिन्यात एकूण जीएसटी (GST Collection) महसूल १,६२,७१२ कोटी रुपये होता. यापैकी केंद्रीय जीएसटी २९,८१८ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३७,६५७ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी ८३,६२३ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या ४१,१४५ कोटी रुपयांसह) आणि उपकर ११,६१३ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या ८८१ कोटी रुपयांसह) होता.
(हेही वाचा – Asian Games 2023 : भारताची यशस्वी घोडदौड; रोलर स्केटिंगमध्ये दोन कांस्य पदकांची कमाई)
अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर २०२३ मध्ये महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात १.४७ लाख कोटी रुपयांच्या जीएसटी (GST Collection) महसुलापेक्षा १० टक्के जास्त होता.
“या महिन्यात देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील (GST Collection) या स्त्रोतांकडून मिळणाऱ्या महसुलापेक्षा १४ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण जीएसटी संकलन १.६० लाख कोटींचा टप्पा पार करण्याची ही चौथी वेळ आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community