अर्थसंकल्पापूर्वी निर्मला सीतारमन यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय! ४८ व्या जीएसटी कौन्सिल परिषदेत झाली चर्चा

152

जीएसटी परिषदेच्या ४८ व्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. १ फेब्रुवारी २०२३ ला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. गुटखा व्यवसायात करचोरी रोखण्यासाठी यंत्रणा तयार करणे, जीएसटी कायद्यांतर्गत गुन्हेगारी रद्द करणे या विषयांचा समावेश सुद्धा या बैठकीत करण्यात आला होता.

( हेही वाचा : सुकेश चंद्रशेखरचे सर्व आरोप खरे! राज्यसभेच्या जागेसाठी केजरीवाल सरकारच्या मंत्र्यांना दिले होते ६० कोटी, अहवाल आला समोर)

बैठकीदरम्यान घेतलेले महत्त्वाचे निर्णय

  • करचुकवेगिरीशी संबंधित गुन्ह्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
  • जैवइंधनावरील जीएसटी ५ टक्केपर्यंत कमी
  • विमा कंपन्यांच्या नो क्लेम बोनसवर जीएसटी लागू होणार नाही.
  • या बैठकीदरम्यान कोणताही नवा कर लादला गेला नसल्याची माहिती शेवटी सीतारमन यांनी दिली. गुन्हेगार ठरविण्यास सहमती देताना खटला चालवण्याची मर्यादा १ कोटींहून दुप्पट करून २ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी ४८ वी जीएसटी कौन्सिलची बैठक संपल्यानंतर सर्व निर्णयांची माहिती दिली.
  • परिषदेदरम्यान १५ पैकी केवळ ८ मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला. पान मसाला आणि गुटखा व्यवसायातील करचोरी रोखण्यासाठी यंत्रणा बनवण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
  • डाळींच्या सालीवरील जीएसटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत डाळींच्या सालीवर ५ टक्के जीएसटी आकारला जात होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.