छत्रपती संभाजी नगर शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा मारला आहे. शुक्रवारी दुपारी सुरु झालेली ही कारवाई अजूनही सुरुच आहे.
शहरातील एका सराफा दुकानावर शुक्रवारी GST च्या वसुली पथकाने छापा टाकला. शुक्रवारी दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कर विभागाचे पथक दुकानात तपास करत होते. दुकानातील कर्मचा-यांना या वेळेत दुकानातच थांबवून ठेवण्यात आले होते. आता शनिवारीही कारवाई सुरुच आहे. बाफना ज्वेलर्स असे कारवाई करण्यात आलेल्या दुकानाचे नाव आहे.
( हेही वाचा: राबडी देवींनंतर आता तेजस्वी यादव यांचा नंबर; CBI ने बजावले समन्स )
जीएसटी चोरल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केली आहे. तर कारवाईसाठी आलेल्या पथकाने दुकानातील सर्व फोन बंद करुन चौकशी सुरु केली. तसेच, या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी- विक्री संबंधित कागदपत्रे तपासली आहेत. यासोबतच वेगवेगळ्या बिलांची तपासणी करण्यात येत असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे. तर संबंधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय असून, त्यानुसार चौकशी केली जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.