भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्ती जवळ हिंदुत्वाची गुढी उभारुन (Gudhi Padwa 2025) हिंदू नववर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी संभाजी देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सुनिल जोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. (Gudhi Padwa 2025)

हेही वाचा- Todays Gold-Silver Price: गुढीपाढव्यानिमित्त सोन्याला झळाळी; काय आहे आजचा दर?
प्रसंगी अंजली मरकड व रोहिणी कुवर यांनी गुढीची भक्तीभावे पुजा करून वंदन केले. सुत्रसंचलन करताना मनोज कुवर यांनी यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदुसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू संघटन हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येतो, समुहाच्या वतीने तेरा वर्षांपासून दरवर्षी हिंदुत्वाची गुढी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूर्ती शेजारी उभारण्यात येते असे सांगितले. (Gudhi Padwa 2025)
तसेच, प्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो असा जयघोष करीत परिसर दणाणून गेला होता. या वेळी समूहाचे योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, संदेश बुरके, दिगंबर करंजकर, तानाजी करंजकर, विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, गणेश कुवर, ओम देशमुख, शेखर जाधव, दिपक गायकवाड, निलेश हासे, संस्कार मरकड, साई देशमुख आदि उपस्थित होते. (Gudhi Padwa 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community