हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. (Gudi Padwa 2025)
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !
गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदाच का? कारण याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. (Gudi Padwa 2025)
(हेही वाचा – सोशल मीडियावर Ghibli चे वेड; ‘एआय’ चित्रांचा महापूर)
नैसर्गिक महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. (Gudi Padwa 2025)
(हेही वाचा – BMC School : मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे; सोमवारपासून क्रीडांगणाची स्वच्छता राखली जाणार)
ऐतिहासिक महत्त्व
रामाने वालीचा वध केल्याचा दिवस : रामाने वालीचा वध या दिवशी केला. ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.
शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस ! : शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला. (Gudi Padwa 2025)
(हेही वाचा – Azlan Shah Hockey : प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेतून पाकला वगळलं)
आध्यात्मिक महत्त्व
सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. ‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. याचा विचार करता आपण गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करायला हवा. गुढीपाडवा हे संकल्पशक्तीचे गुढत्व दर्शवते. ‘आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील’, असे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. (Gudi Padwa 2025)
(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या पद्धती’)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community